नवी दिल्ली: सौरव गांगुली यांची दिल्ली कॅपिटल्सने क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. (IPL 2023) बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून (BCCI) पायउतार झाल्यानंतर गांगुली पहिल्यांदाच मोठे पद सांभाळणार आहे. (sourav ganguly join delhi capitals) सौरव गांगुली आता इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्स संघाची मोठी जबाबदारी खेळताना दिसणार आहे. (Sourav Ganguly ) दिल्ली कॅपिटल्सने सौरव गांगुलीची क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सला एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. सौरव याआधी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सशीही जोडला गेला आहे. 2019 मध्ये, गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक होता. आयपीएल व्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्सने दक्षिण आफ्रिका लीग आणि दुबई क्रिकेट लीगमध्येही संघ खरेदी केले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अधिक जबाबदारी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडले.
सौरव गांगुली तीन वर्षे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली नाही. दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग असून दोन्ही संघ विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स टीम ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोमेन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नोर्किया, चेतन साकारिया, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि रिले रोसो.
दिल्लीने एकदाही विजेतेपद पटकावले नाही २००८
राजस्थान रॉयल्स (चेन्नईचा ३ गडी राखून पराभव)
2009: डेक्कन चार्जर्स (बंगळुरूचा 6 धावांनी पराभव)
2010: चेन्नई सुपर किंग्ज (मुंबईचा 22 धावांनी पराभव)
2011: चेन्नई सुपर किंग्ज (बंगळुरूचा 58 धावांनी पराभव)
2012: कोलकाता नाइट रायडर्स (चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव)