नूर सुल्तान - भारताचा युवा कुस्तीपटू दीपक पुनियाने ऐतिहासिक कामगिरी करत विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. दीपकने ८६ किलो वजनी गटातून अंतिम फेरीत पोहोचला असून भारतासाठी एक पदक निश्चित झाले आहे. २०१९ मध्ये अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला कुस्तीपटू ठरला आहे.
स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाने उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या कार्लोस अर्टुरो मेंडिझ याच्याशी दोन हात केले. त्याने मेंडिझला ७-६ असे पराभूत केले. एक मिनिटाचा खेळ शिल्लक असताना तो ३-६ ने असा पिछाडीवर होता. पण त्याने शेवटच्या मिनिटात सामना पलटवला.
दीपकचा उपांत्य फेरीचा सामना स्वित्झर्लंडच्या स्टीफन रेचमुथ याच्याशी झाला. या सामन्यात त्याने स्टीफनचा ७-६ ने पराभव केला. स्पर्धेत दीपकच्या पदकासह भारताने ४ पदक जिंकली आहेत. यात विनेश, बजरंग, रवी कुमार यांच्यासह आता दीपकच्या पदकाचा समावेश आहे.