नवी दिल्ली :डेविस कप वर्ल्ड ( Davis Cup World ) ग्रुप प्लेऑफ 1 टाईमध्ये रामकुमार रामनाथनने शुक्रवारी दिल्ली जिमखाना क्लबमध्ये पहिल्या एकेरीच्या लढतीत भारताने डेन्मार्कच्या क्रिश्चियन सिग्सगार्डचा 6-3, 6-2 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. त्याचबरोबर भारताने 1-0 अशी आघाडी ( India lead 1-0 against Denmark ) घेतली.
जागतिक क्रमवारीत 170व्या स्थानी असलेला रामकुमार पहिल्या गेमपासूनच सर्वोत्तम प्रदर्शन करत खेळत होता. त्याने आपल्या 24 वर्षीय प्रतिस्पर्ध्याच्या सर्व्हिसला नियमितपणे प्रतिसाद दिला आणि सहजतेने गुण मिळवले.