महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

प्रो कबड्डी : मंजीत छिल्लरच्या चुकीमुळे तमिळ थलायव्हाजचा निसटता पराभव - manjit chillar

सामन्याच्या पहिल्या सत्रात तमिळ थलायव्हाजचा संघ १८-११ गुणांनिशी आघाडीवर होता. मात्र, दुसऱ्या सत्रात दिल्लीच्या संघाने दमदार पुनरागमन करत सामन्याचे चित्रच पालटले.

प्रो कबड्डी - मंजीत छिल्लरच्या चुकीमुळे दबंग दिल्लीचा निसटता विजय

By

Published : Jul 26, 2019, 2:23 PM IST

हैदराबाद -प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक टॅकल गुण असणाऱ्या मंजीत छिल्लरच्या एका चुकीमुळे दबंग दिल्लीला तमिळ थलायव्हाजवर निसटता विजय मिळवता आला. हैदराबादमध्ये झालेल्या या महत्वपूर्ण सामन्यात दबंग दिल्लीने तमिळ थलायव्हाजवर ३०-२९ ने सरशी साधली.

सामन्याच्या पहिल्या सत्रात तमिळ थलायव्हाजचा संघ १८-११ गुणांनिशी आघाडीवर होता. मात्र, दुसऱ्या सत्रात दिल्लीच्या संघाने दमदार पुनरागमन करत सामन्याचे चित्रच पालटले. दिल्लीकडून नवीन कुमारने केलेल्या सामन्याच्या शेवटच्या रेडमध्ये तमिळ थलायव्हाजच्या मंजीत छिल्लरचा पाय मैदानाच्या अंतिम रेषेला लागला. त्यामुळे त्याला बाद घोषित करण्यात आले. या गुणामुळे वरचढ होऊन दिल्लीच्या संघाने सामना खिशात घातला.

दिल्लीकडून नवीन कुमारने आठ, मेराज शेखने सहा तर कर्णधार जोगिंदर नरवालने चार गुण मिळवले. तर, तमिळ थलायव्हाजच्या राहुल चौधरीने सात, अजय ठाकुरने आणि मंजीत छिल्लरने पाच गुण मिळवले. या हंगामात दबंग दिल्लीने दुसरा विजय मिळवला आहे. तर, तमिळ थलायव्हाजला दोन सामन्यांमधील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details