बर्मिंगहॅम :वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो गटात एकूण 201 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले ( Mirabai Chanu wins Gold medal ) आहे. या प्रकारात तिने रेकॉर्ड केला आहे. ( Commonwealth Games 2022 )
मीराबाई चानूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. चानूने एकूण 201 किलो वजन उचलून महिलांच्या 49 किलो वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले. हे या खेळातील भारताचे दिवसाचे तिसरे पदक आहे.
संकेत सरगर (रौप्य) आणि गुरुराजा (कांस्य) यांनी भारतासाठी आज पदक जिंकले आहे. चानू, जिने गोल्ड कोस्ट याठिकाणी 2018 CWG मध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलल्यामुळे ती स्पर्धकांपेक्षा पुढे गेली होती.
मीराबाईने या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या मॉरीशियाच्या रोइल्या रानाईवोसोआ पेक्षा २९ किलो अधिक वजन उचलले. कॅनडाच्या हॅना कामिन्स्कीने एकूण १७१ किलो (७४ किलो + ९७ किलो) वजन उचलून कांस्यपदक पटकावले.
हेही वाचा :CWG 2022 : वेटलिफ्टींगमध्ये भारताला सलग दुसरे पदक; गुरुराज पुजारीने कांस्यपदकावर कोरले नाव