नवी दिल्ली : पोर्तुगालचा करिश्माई फॉरवर्ड ख्रिस्तियानो रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड ( Manchester United ) क्लबपासून फारकत घेतली ( Cristiano Ronaldo leave Manchester United ) आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी फुटबॉलपटू वेन रुनीने याबद्दल दु:ख व्यक्त केले ( Cristiano Ronaldo has Parted Ways with Manchester United Club ) आहे. मंगळवारी रात्री मँचेस्टर युनायटेडने त्यांच्या सोशल मीडियाद्वारे घोषित केले की रोनाल्डो तत्काळ प्रभावाने परस्पर कराराने क्लब सोडणार आहे. संघासोबत दोन हंगाम घालवल्याबद्दल आणि उत्तम योगदान दिल्याबद्दल क्लब त्याचे आभार मानतो.
टिव्ही मुलाखतीत रोनाल्डोने व्यवस्थापकावर आणि मॅंचेस्टर क्लबवर केले होते आरोप :कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निघण्यापूर्वी एका टीव्ही मुलाखतीत पोर्तुगीज स्टारने याआधी क्लब आणि मुख्य प्रशिक्षक एरिक टेन हाग यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर ही घोषणा झाली.