नवी दिल्ली : देहरादूनमधील एका क्रिकेट प्रशिक्षकावर गंभीर आरोप झाले आहेत. कोचवर कोचिंग घेण्यासाठी आलेल्या या युवा क्रिकेटपटूने पोलीस ठाण्यात लैंगिक छळ, धमक्या आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याची तक्रार दिली आहे. नरेंद्र शाह असे या प्रशिक्षकाचे नाव असून, ते क्रिकेट कोचिंग सेंटर चालवतात. नरेंद्र शाह हे वरिष्ठ महिला संघाच्या खेळाडूचे प्रशिक्षक राहिले आहेत. महिला क्रिकेटरच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र शाह याच्यावर विनयभंग आणि लैंगिक छळाचे आरोप :आत्महत्येच्या प्रयत्नानंतर काही दिवसांनी शाह याच्यावर विनयभंग आणि लैंगिक छळाचे आरोप झाले. त्यांच्या सेंटरमध्ये कोचिंग घेणाऱ्या तरुणीने लैंगिक छळाचे आरोप त्यांच्यावर केले आहेत. प्रशिक्षकाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये कोच कथितरित्या सेक्स करीत आहे आणि अपशब्द वापरत आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली.
पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी :आरोपी प्रशिक्षक रुग्णालयात दाखल आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रशिक्षक आता बोलू शकत नाही. ते बोलण्याच्या स्थितीत येताच त्यांचे म्हणणे नोंदवले जाईल. देहरादूनचे एसएसपी दलीप सिंह कुंवर म्हणाले, पोलीस आरोपांची कसून चौकशी करीत आहेत. आरोपीवर IPC च्या कलम 354-A (लैंगिक छळ) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) आणि POCSO कायद्याच्या कलम 7 आणि 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल :शाह यांच्यावर एससी-एसटी कायद्यांतर्गत (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती) गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा उषा नेगी यांनी केंद्रातील काही मुलींशी बोलल्यानंतर दोन नवीन तक्रारी दाखल केल्या आहेत. नेगींचा आरोप आहे की, 'कोच मध्यरात्री अकादमीच्या वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये जबरदस्तीने घुसायचा. देहरादूनच्या बाहेर क्रिकेट कार्यक्रमादरम्यान त्याने मुलींची छेड काढली होती.
हेही वाचा : Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू