टोकियो- कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवल्याने, क्रीडा विश्वातील अनेक स्पर्धा रद्द तर काही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला संभाव्य खेळाडूंचा संघ (ग्लोबल अॅथलिट) यांनी देखील पाठिंबा दिला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवरील (आयओसी) दडपण वाढले आहे.
ग्लोबल अॅथलिट संघाकडून रविवारी यासंदर्भात एक निवेदन पत्र आयओसीला देण्यात आले. यात त्यांनी, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आले असल्याने 'आयओसी'नेसुद्धा लवकरच ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, असं अपील केलं आहे.
ग्लोबल अॅथलिटचे संस्थापक कराड ओ डोनोवान म्हणाले की, 'आयओसी सध्याचे दिवस सर्वसामान्य दिवसांप्रमाणे समजत आहे. त्यांचा याबाबतचा दृष्टिकोन विचित्र वाटत आहे.'
काय आहे ग्लोबल अॅथलिटच्या निवेदन पत्रात -