बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधून भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. मनिका बत्राने ( Table Tennis Player Manika Batra ) टेबल टेनिसमध्ये आपला पहिला सामना जिंकला आहे. मनिकाने पहिला गेम 11-5 असा जिंकला. त्याचवेळी दुसऱ्या गेममध्ये 11-3 आणि तिसऱ्या गेममध्ये 11-2 असा विजय मिळवला. त्याचवेळी, जलतरणपटू श्रीहरी नटराजने ( Swimmer Srihari Nataraj ) पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने हीट 4 मध्ये 54.68 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.
यासह भारताने दक्षिण आफ्रिकेवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय स्टार मनिका बत्रासमोर मुशफिकुह कलाम होती. भारतीय खेळाडू मनिका बत्राने पहिल्या गेममध्ये मुशफिकुह कलामचा 11-5 अशा फरकाने पराभव केला. पहिल्या गेममध्ये तिने प्रतिस्पर्ध्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्याचवेळी दुसऱ्या गेममध्येही मनिका बत्राने प्रतिस्पर्ध्याला एकही संधी दिली नाही. हा खेळही तिने एकतर्फी पद्धतीने सहज जिंकला.