बर्मिंगहॅम: कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( Commonwealth Games 2022 ) स्पर्धेत भारताला अजून एक पदक मिळाले आहे. प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले ( Priyanka Goswami won silver medal ) आहे. तिने 43.38 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने 42.34 मिनिटात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. त्याचवेळी केनियाच्या एमिलीने 43.50.86 मिनिटांत शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले.
भारताचे पदक विजेते -
9 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि दीपक पुनिया