बर्मिंगहॅम: लॉन बॉलच्या शेवटच्या सामन्यात पुरुष संघाला (चार खेळाडू) नॉर्दर्न आयर्लंडविरुद्ध पराभवाचा सामना ( Indian lawn bowls team lost against Northern Ireland ) करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान ( mens team won silver medal in lawn bawl ) मानावे लागले आहे. 14व्या शेवटानंतर भारतीय संघाने ( Indian lawn bowls team ) हा सामना 18-5 ने गमावला. सुनील बहादूर, नवनीत सिंग, चंदन कुमार सिंग आणि दिनेश कुमार या जोडीने भारतासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
शरथ कमल, श्रीजा अकुला अंतिम फेरीत -त्याचबरोबर शरथ कमल आणि श्रीजा अकुला या जोडीने टेबल टेनिसमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय जोडीने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन जोडीचा 11-9, 11-8, 9-11, 12-14, 11-7 असा पराभव करत किमान रौप्यपदक निश्चित केले.