महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

... वय वर्षे तीन... सोलापूरची मॅरेथॉन झाली इंटरनॅशनल - सोलापूर मॅरेथॉन

गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या सोलापूर रनर्स असोसिएशनच्या सोलापूर मॅरेथॉनला यंदाच्या तिसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ३.५ किलोमीटर 'फन रन' अशा तीन गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे. ५ जानेवारीला (रविवार) सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी २१ किलोमीटरच्या अर्ध मॅरेथॉनला हिरवा झेंडी दाखवून सुरूवात होणार आहे.

CNS Solapur International Marathon organized on 5 january
सोलापूर मॅरेथॉन : पाच हजाराहून अधिक धावपटू स्वच्छतेचा नारा देत धावणार

By

Published : Jan 1, 2020, 8:51 PM IST

Updated : Jan 2, 2020, 3:47 PM IST

सोलापूर - दरवर्षीप्रमाणे सोलापूर रनर्स असोसिएशनच्यावतीने येत्या रविवारी (ता. ५ जानेवारी) सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह जवळपास साडेपाच हजार धावपटूंचा सहभागी होणार आहेत. तर साडेतीन किलोमीटरच्या 'फन रन'मधून 'स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर'चा नारा देण्यात येणार आहे, याची माहिती सोलापूर रनर्सचे अध्यक्ष डॉ. यशवंत पेठकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या सोलापूर रनर्स असोसिएशनच्या, सोलापूर मॅरेथॉनला यंदाच्या तिसऱ्यास वर्षी आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ३.५ किलोमीटर 'फन रन' अशा तीन गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे. ५ जानेवारीला (रविवार) सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी २१ किलोमीटरच्या अर्ध मॅरेथॉनला हिरवा झेंडी दाखवून सुरूवात होणार आहे. त्यानंतर १० किलोमीटरच्या अॅचिव्हर्स रन आणि ३.५ किलोमीटरची फन रनला सुरूवात होणार आहे.

सोलापूर मॅरेथॉनच्याआधी शनिवारी (ता. ४ जानेवारी) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेयपर्यत प्री-मॅरेथॉन ए्नस्पोचे हरिभाई देवकरण प्रशालेजवळील नूतन महाविद्यालय शाळेच्या आवारात आयोजन करण्यात आले आहे.

खेळाडूंना टी शर्टसाठी ही प्रक्रिया करावी लागणार -

सोलापूर मॅरेथॉनसाठी ज्यांनी नावे नोंदवली आहेत. त्यांना मोबाईलवर एसएमएसने माहिती देण्यात आली आहे. तसेच तो एसएमएस आणि आपले ओळखपत्र दाखवून सहभागी स्पर्धकांनी आपले टी शर्ट, गुडी बॅग आणि बीब नंबर घेवून जावं. टी शर्टवर बीब कसे लावावे, याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार असल्याची माहीती डॉ. सत्यजित वाघचवरे यांनी दिली.

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय, सोलापूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर मॅरेथॉनला मोठे सहकार्य लाभले आहे.

असे असतील मॅरेथॉन स्पर्धेचे मार्ग -

हरिभाई देवकरण प्रशालेपासून २१ किलोमीटरची सुरू होणारी अर्ध मॅरेथॉन स्पर्धा डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता, शासकीय दूध डेअरी, संभाजी तलाव, आयटीआय, भारती विद्यापीठ, डी मार्ट, टाकळीकर मंगल कार्यालय मार्गे विजापूर रोडकडून सैफूल, एसआरपी कॅम्पच्या पुढे जावून पुन्हा त्याच मार्गाने हरिभाई देवकरण प्रशाला येथे समारोप होईल.

तर १० किमीसाठी हरिभाई देवकरण प्रशालेपासून डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता, शासकीय दूध डेअरी, संभाजी तलाव, आयटीआय, भारती विद्यापीठ, गोविंदश्री मंगल कार्यालय पासून पुन्हा त्याच मार्गाने हरिभाई देवकरण प्रशालेजवळ समारोप होईल. ३.५ किमीच्या फन रनला हरिभाई देवकरण प्रशालापासून सुरूवात होऊन डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता येथून त्याच मार्गाने हरिभाई देवकरण प्रशाला येथे समारोप होणार आहे.

सोलापूर मॅरेथॉनसाठी असे आहे नियोजन -

सोलापूर मॅरेथॉनचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन केले आहे. ही स्पर्धा वेळेवर सुरू होणार आहे. स्पर्धेच्या मार्गावर आकर्षकरित्या रोषणाई करण्यात आली असून विविध ठिकाणी स्पर्धकांना पाणी, ग्लुकोज आणि डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मॅरेथॉन मार्गावरील स्वच्छतेचा विडा यांनी उचलला -

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला सोलापूरकरांनी मॅरेथॉनच्या मार्गावर दोन्ही बाजूला उभे राहून स्पर्धक धावपटूंचे मनोबल वाढवण्यासाठी यावे, असे आवाहन सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.

दरम्यान, मॅरेथॉन मार्गावर महानगर पालिकेच्यावतीने पथदिवे, खड्डे बुजवणे, रस्ता दुरूस्ती तसेच मोबाईल टॉयलेटची सुविधा करण्यात आली आहे. मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्यानंतर मॅरेथॉन मार्गावर होणारा कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी डॉ. विक्रम दबडे यांनी घेतली आहे.

वाहतूक मार्गात बदल -
रविवारी पहाटेपासून मॅरेथॉन मार्गावरील जड वाहतुक बंद करण्यात येणार आहे. तसेच या मार्गावरील वाहतुक विजापूर रस्त्याकडून स्टेशनकडे जाण्यासाठी रेवणसिध्देश्वर मंदिर रोड, मोदी पोलीस चौकी मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच होटगी रोड, कुमठा नाका, लष्कर परिसरातून स्टेशनकडे जाण्यासाठी सातरस्ता येथून रंगभवन मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.

Last Updated : Jan 2, 2020, 3:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details