दोहा -सध्या सुरू असलेल्या १४ व्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या चिंकी यादवने नेमबाजीत मोठी कामगिरी केली. २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या चिंकीने अंतिम सामन्यात रौप्यपदक जिंकले आणि पुढच्या वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही मिळवले.
हेही वाचा -अजिंक्य रहाणेच्या मुलीचं झालं बारसं, नाव आहे.....
या स्पर्धेत ऑलिम्पिकचा कोटा जिंकणारी चिंकी दुसरी तर, एकूण ११ वी भारतीय नेमबाजपटू ठरली आहे. तिने एकूण ५८८ गुण मिळवत अंतिम सामन्यात २९६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. थायलंडच्या नापहास्वान यांगुपेनबूने २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. यांगुपेनबूनेला ५९० गुण मिळाले.
दोहात सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत राही सरनोबतने भारतासाठी पहिला ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.