न्यूयॉर्क -कोरोना व्हायरसमुळे यंदाची शिकागो मॅरेथॉन रद्द करण्यात आली आहे. यावर्षी 11 ऑक्टोबरला ही मॅरेथॉन होणार होती. ''धावपटू, प्रेक्षक आणि स्वयंसेवकांचे आरोग्य लक्षात घेऊन शिकागो मॅरेथॉन रद्द करण्यात आली आहे'', असे या स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले.
तत्पूर्वी, 1 नोव्हेंबरला न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन देखील जूनमध्ये रद्द करण्यात आली होती. आता पुढच्या वर्षी 7 नोव्हेंबरला ही स्पर्धा होईल. इंडोनेशियाच्या बाली येथे होणारी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धाही कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आली आहे. ही मॅरेथॉन यावर्षी 30 ऑगस्ट रोजी होणार होती.