धर्मशाला- हिमाचल सरकारकडून जमीन मिळाल्यानंतर केंद्र सरकार धर्मशाला जवळ अत्याधुनिक 'हाय एल्टीट्यूड स्पोर्टस् ट्रेनिंग सेंटर' उभारण्यासाठी तयार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ठाकूर आज रविवारी धर्मशाला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अनुराग ठाकूर म्हणाले की, आम्ही पुढील काळात धर्मशालात क्रीडा सुविधांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही भविष्यात या शहरामध्ये अधिक स्पर्धेचे आयोजन व्हावे, यासाठी देखील काम करत आहोत.
नरेंद्र मोदी सरकार देशातील क्रीडा स्तर अधिक चांगला करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. यात चांगल्या खेळाडूंना देश आणि विदेशात सरावासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे देखील ठाकूर म्हणाले.