ऑग्सबर्ग: जर्मनीच्या बुंदेसलिंगा फुटबॉल स्पर्धेच्या ( Bundeslinga football tournament ) इतिहासात प्रथमच, रोजा सोडण्यासाठई सलामीसाठी सामना मध्येच थांबवण्यात आला. एफएसव्ही मेंझ विरुद्ध ऑग्सबर्ग ( FSV Mainz vs Augsburg ) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान रेफ्रींनी खेळाडूला रोजा (उपवास) सोडण्याची संधी दिली. सामन्याच्या 65व्या मिनिटाला रेफ्री मॅथिस जोलेनबेकने सामना थांबवला आणि मेंझचा बचावपटू मोझेस नियाचेने ( Moses Niache ) पटकन पाणी प्यायला.
एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या रमजान महिन्यात उपवासाच्या दिवशी काहीही खात नाहीत. संध्याकाळी उपास सोडायच्यावेळी नियाखातेने दोन वेगवेगळ्या बाटल्यांमधून पाणी पिले आणि हात मिळवून रेफरीचे आभार मानले.