पॅरिस - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) २०२४मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंग नृत्याचा समावेश केला आहे. तरुणांना समाविष्ट करण्यासाठी आयओसीने हा निर्णय घेतला. या व्यतिरिक्त स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग यांनाही या खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या खेळांना टोकियोतील ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात येणार होते. मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही.
मोठी बातमी...ब्रेकडान्सिंगचा ऑलिम्पिकमध्ये समावेश - breakdancing olympic debut
प्रशासकीय अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगला या निर्णयात मोठे नुकसान झाले आहे. रिओ दि जानेरोच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी वेटलिफ्टर्स पॅरिस ऑलिम्पिकमध्ये असतील. हा कोटा १२० खेळाडूंचा आहे.
आयओसीने टोकियोच्या तुलनेत पॅरिस क्रीडा स्पर्धेत पदकांच्या स्पर्धांची संख्या दहाने कमी केली आहे. या स्पर्धेत आता ३२९ पदके असतील. वेटलिफ्टिंगच्या चार श्रेणी कमी करण्यात आल्या आहेत. यासह, २०२४मधील खेळाडूंचा कोटा १०, ५०० असा असणार आहे. हा कोटा टोकियो ऑलिम्पिकपेक्षा ६०० खेळाडूंनी कमी आहे.
प्रशासकीय अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगला या निर्णयात मोठे नुकसान झाले आहे. रिओ दि जानेरोच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी वेटलिफ्टर्स पॅरिस ऑलिम्पिकमध्ये असतील. हा कोटा १२० खेळाडूंचा आहे.
आयओसीनुसार, उद्दीष्ट हे पुरुष आणि स्त्रियांचा समान सहभाग, हे ऑलिम्पिकचे उद्दिष्ट आहे. ब्रेकडान्सिंग ऑलिम्पिकमध्ये ब्रेकिंग या नावाने ओळखले जाईल. अमेरिकेत सत्तरच्या दशकात हा शब्द या नृत्यप्रकारासाठी वापरला जात होता. युवा क्रीडा क्षेत्रातील यशस्वी चाचणीनंतर या नृत्यप्रकाराचा समावेश करण्याचा प्रस्ताव होता. आयओसी बोर्डाने नंतर त्याला मंजुरी दिली. पॅसिफिक महासागरातील ताहितीच्या किनाऱ्यावर सर्फिंग घेण्यात येईल.