महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महान बॉक्सर मेरी कोमची आयओए अ‍ॅथलीटच्या अध्यक्षपदी निवड; तर शरथ कमल यांची उपाध्यक्षपदी निवड - Boxing Star Mary Kom Elected as Chairperson of IOA

आठ वेळा विश्व कप ( Mary Kom has been an Eight Time World Champion ) चॅम्पियन बाॅक्सर ( World Championship Medalist ) एमसी मेरी काॅमची सर्वसंम्मतीने भारतीय आॅलिम्पिक संघ आयओएच्या एथलीट आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे. ( Mary Kom Won Bronze Medal in 2012 London Olympics ) आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता टेबल टेनिस खेळाडू अचंता शरथ कमल यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली ( Achant Sharath Kamal Elected as Vice President ) आहे.

Mary Kom Elected as The Chairperson of IOA
महान बॉक्सर मेरी कोमची आयओए अ‍ॅथलीटच्या अध्यक्षपदी निवड

By

Published : Nov 15, 2022, 4:45 PM IST

नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आठ वेळा विश्व कप चॅम्पियन ( World Championship Medalist ) महिला बॉक्सर मेरी कोमची IOA आयओएच्या ऍथलीट आयोगाच्या अध्यक्षपदी निवड ( Mary Kom has been an Eight Time World Champion ) केली आहे. पदावर एकमताने निवड झाली. ( Mary Kom Won Bronze Medal in 2012 London Olympics ) त्याचवेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमल यांची उपाध्यक्षपदी निवड ( Achant Sharath Kamal Elected as Vice President ) करण्यात आली.

मेरी कोम आठ वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती :मेरी कोम आठ वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती आहे. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहा वेळा (2002, 2005, 2006, 2008, 2010, 2018) सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचवेळी मेरी कोमने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. मेरी कोम दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेती आहे. मेरी कोमने 2014 इंचॉन आशियाई खेळांमध्ये सुवर्ण आणि 2010 ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले आहे.

भारताच्या सर्वात यशस्वी खेळाडूंच्या बाबतीत शरथ तिसऱ्या स्थानावर :त्याचवेळी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताच्या सर्वात यशस्वी खेळाडूंच्या बाबतीत शरथ तिसऱ्या स्थानावर आहे. फक्त जसपाल राणा (नेमबाजी) आणि समरेश जंग (नेमबाजी) यांनी त्यांच्यापेक्षा जास्त पदके जिंकली आहेत. जसपालच्या नावे 15 पदके (9 सुवर्ण) आणि समरेशच्या नावे 14 पदके (7 सुवर्ण) आहेत. शरतने राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण सात सुवर्णपदके जिंकली आहेत. 2022 च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये तीन सुवर्णपदकांव्यतिरिक्त, शरथने 2006 मध्ये पुरुष एकेरी आणि पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्ण, 2010 मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण आणि 2018 मध्ये पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

अचंत शरथ कमल यांची कामगिरी :याशिवाय त्याने 2010 मध्ये दोन कांस्य, 2014 आणि 2018 मध्ये प्रत्येकी एक रौप्य आणि 2022 मध्ये एक पदक जिंकले आहे. शरथने राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 13 पदके जिंकली आहेत. कॉमनवेल्थ गेम्सशिवाय आशियाई गेम्समध्ये शरतने दोन पदके जिंकली आहेत. 2018 मध्ये, जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत शरथ कमलने पुरुष सांघिक आणि मिश्र दुहेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. याशिवाय त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदकेही जिंकली आहेत. 2021 दोहा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.

ABOUT THE AUTHOR

...view details