महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बॉक्सिंगपटूंसाठी पटियाला येथे होणार सराव शिबिर - Boxing federation of india news

फेडरेशनला 10 जूनपासून हे शिबिर आयोजित करायचे होते. परंतु ते राज्य सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या (एसएआय) परवानगीच्या प्रतीक्षेत होते. हे शिबिर पटियाला येथे होणार असल्याचे महासंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Boxing national camp will start next month says official
बॉक्सिंगपटूंसाठी पटियाला येथे होणार सराव शिबिर

By

Published : Jun 30, 2020, 3:39 PM IST

नवी दिल्ली -भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने (बीएफआय) ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या बॉक्सिंगपटूंसाठी पटियाला येथे सराव शिबिर सुरू करण्याचा विचार केला आहे. फेडरेशनला सरावासाठी आवश्यक असणारी परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

फेडरेशनला 10 जूनपासून हे शिबिर आयोजित करायचे होते, परंतु ते राज्य सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या (एसएआय) परवानगीच्या प्रतीक्षेत होते. हे शिबिर पटियाला येथे होणार असल्याचे महासंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

1 जुलैपर्यंत बॉक्सिंगपटू येथे येतील. यानंतर, विभाजन आणि चाचणीनंतर सराव सुरू होईल. कागदी कामकाज जवळजवळ पूर्ण झाले आहे. लॉजिस्टिकशी संबंधित काम प्रगतीपथावर आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या नऊ बॉक्सरमध्ये अमित पांघल (52 किलो), मनीष कौशिक (63 किलो), विकास कृष्णन (69 किलो), आशिष कुमार (75 किलो), सतीश कुमार (91 किलो), एमसी मेरी कोम (51 किलो), सिमरजित कौर (60 किलो), लोव्हलिना बोरगोहिन (69 किलो), आणि पूजा राणी (75 किलो) यांचा समावेश आहे. बीएफआय पुरुष आणि महिलांसाठी संयुक्त शिबिरे आयोजित करेल. यापूर्वी महिलांसाठी राष्ट्रीय शिबिर दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details