महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

काँग्रेसकडून उभारलेल्या विजेंदरला जनतेचा 'पंच', निवडणुकीत डीपॉझिटसह सरकारी नोकरीही गेली - south delhi

लोकसभा निवडणूकीसाठी विजेंदर सिंगला काँग्रेस पक्षाकडून टिकीट देण्यात आले होते. त्यामुळे टिकीट मिळण्यापूर्वी त्याने आपल्या डीएसपी पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूकीत त्याचा इतका दारुण पराभव झाला की त्याचे डीपॉझिटच जप्त झाले.

विजेंदर सिंग

By

Published : May 27, 2019, 11:29 AM IST

नवी दिल्ली - भारताचा स्टार बॉक्सिंगपटू आणि दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार विजेंदर सिंग याला यंदाची निवडणूक फारच महागात पडली. निवडणूकीत पराभव तर झालाच, पण त्याला मिळालेल्या डीएसपी पदाचा त्यागही करावा लागला.
लोकसभा निवडणूकीसाठी विजेंदर सिंगला काँग्रेस पक्षाकडून टिकीट देण्यात आले होते. त्यामुळे टिकीट मिळण्यापूर्वी त्याने आपल्या डीएसपी पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूकीत त्याचा इतका दारुण पराभव झाला की त्याचे डीपॉझिटच जप्त झाले.
हरयाणाच्या विजेंदर सिंगचे बॉक्सिंग करियर पाहता माजी मुख्यमंत्री भूपंद्र सिंग हुड्डा यांनी त्याची २००८ साली डीएसपी पदी निवड केली होती. त्यापासुन विजेंदर हरयाणा पोलीसमध्ये डीएसपीपदी होता. परंतु, नियमानुसार निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही शासकीय पदावर राहता येत नाही. त्यामुळे विजेंदरने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
दक्षिण दिल्लीत विजेंदरची प्रमुख लढत ही भाजपच्या रमेश बिधुडी आणि आम आदमी पक्षाच्या राघव चड्ढा यांच्याशी झाली. यामध्ये भाजपचे रमेश बिधुडी विजयी झाले

ABOUT THE AUTHOR

...view details