नवी दिल्ली -भारताचा स्टार बॉक्सर आणि आशियाई रौप्यपदक विजेता सुमित सांगवानवरील एका वर्षाची बंदी उठवण्यात आली आहे. सांगवानने अनवधानाने बंदी घातलेला पदार्थ सेवन केला असल्याचे राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीने (नाडा) सोमवारी स्पष्ट केले.
हेही वाचा -...अखेर 'तो' मैदानात उतरला..पाहा व्हिडिओ
सांगवानच्या लघवीच्या नमुन्यात 'अॅसेटॅझोलामाइड' या उत्तेजकांचे अंश सापडले होते. त्यामुळे त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेला २७ वर्षीय सांगवान यावर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकणार नाही.
'नाडाच्या निर्णयाने मला दिलासा मिळाला आहे. मला माहीत आहे की मी चूक केलेली नाही. स्वत: ला सिद्ध करण्यास सक्षम असल्याने मला आनंद झाला आहे', असे सांगवानने नाडाच्या निर्णयानंतर सांगितले.