महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Wrestler Bhagyashree Fund : बल्गेरिया येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भाग्यश्री फंडची निवड - Bhagyashree Fund Selected International Wrestling Tournament

20 वर्षाखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणीमध्ये ( Under-20 World Championship Selection Trials ) भाग्यश्री फंडने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. तिने या निवड चाचणीमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपली खेळातील गुणवत्ता सिद्ध केली. या निवडीमुळे भाग्यश्रीला बल्गेरिया येथे होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप कुस्ती ( Junior World Championship ) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येणार आहे.

Bhagyashree Fund
भाग्यश्री फंड

By

Published : Jul 17, 2022, 5:24 PM IST

अहमदनगर : 16 जुलै रोजी लखनऊ येथे पार पडलेल्या 20 वर्षाखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणीमध्ये ( Under-20 World Championship Selection Trials ) भाग्यश्री फंडने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. तिने या निवड चाचणीमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपली खेळातील गुणवत्ता सिद्ध केली. या निवडीमुळे भाग्यश्रीला बल्गेरिया येथे होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप कुस्ती ( Junior World Championship ) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येणार आहे. त्या श्रीगोंदा तालुक्यातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा कॉलेजची विद्यार्थीनी आहे. तसेच भाग्यश्री स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत इंटरनॅशनल कुस्ती संकुलाच्या पैलवान आहेत.



धनश्री फंड (55 KG )आणि भाग्यश्री फंड (59 KG) वजन गटामध्ये या दोन्ही बहिणींनी प्रत्येकी दोन कुस्त्या करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर दोघींनी दाखवूनदिले की महाराष्ट्राची माती किती कसदार आहे. परंतु अंतिम सामन्यात धनश्री फंडला यशाने हुलकावणी दिली. मात्र भाग्यश्रीने ( Wrestler Bhagyashree Fund ) आपल्या बहिणीची कसर भरून काढतं अंतिम सामना ही मोठ्या चपळायीने जिंकला. ज्यामुळे तिची बल्गेरिया येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड ( Bhagyashree Fund Selected International Wrestling Tournament ) झाली आहे.

या निवडीमुळे भाग्यश्रीला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी भेटली आहे. या मिळालेल्या संधीचे भाग्यश्री नक्कीच सोनं करेल व भारत देशाला तिच्या माध्यमातून सुवर्ण नक्कीच भेटेल. भाग्यश्रीच्या व धनश्रीच्या या यशाबद्दल त्यांच्यावर आता कौतुकांचा वर्षाव होत आहे. या यशात त्यांनी वडील मेजर हनुमंत फंड आणि शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ, शारीरिक संचालिका प्रा. बहिरम मॅडम, कोच नवीन पुनिया यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा -Vdarkamai Temple Shirdi : साईबाबांच्या व्‍दारकामाई मंदिराच्‍या दर्शन वेळेत बदल

ABOUT THE AUTHOR

...view details