मुंबई - यंदाच्या हंगामात विजयासाठी आसुसलेल्या पुणेरी पलटनचा बंगाल वॉरियर्सने धुव्वा उडवला आहे. बंगालने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना पुण्यावर ४३-२३ ने मात केली आहे. बंगालने यंदाच्या हंगामातल्या आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.
प्रो कबड्डी : बंगाल वॉरियर्सकडून पुणेरी पलटनचा धुव्वा, ४३-२३ ने मात - पुणेरी पलटन
पहिल्या सत्रात बंगालच्या मणिंदर सिंहने चढाईमध्ये ७ गुणांची कमाई केली. त्यामुळे बंगालला आघाडी घेता आली.
पहिल्या सत्रात बंगालच्या मणिंदर सिंहने चढाईमध्ये ७ गुणांची कमाई केली. त्यामुळे बंगालला आघाडी घेता आली. शिवाय, त्याचाच जोडीदार मोहम्मद नबीबक्षने त्याचा चांगली साथ दिली. सामन्याच्या अर्ध्या वेळापर्यंत बंगालने १८-९ अशी आघाडी घेतली होती.
अखेरच्या सत्रात पुण्याच्या खेळाडूंनी प्रतिकार केला खरा पण तो अपुरा पडला. पंकज मोहीते, सुशांत साहील यांनी चढाईत कौशल्य दाखवले. त्याचबरोबर स्टार खेळाडू गिरीश एर्नाकनेही प्रतिकार केला. दुसऱ्या सत्रात, बंगालने पुणेरी पलटणला सर्वबाद २४-११ अशी मोठी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र, पुण्याला ही पिछाडी भरुन काढता आली नाही.