कोलकाता :सौराष्ट्रच्या साकरियाने भेदक गोलंदाजी करीत 3 विकेट घेतल्या. तर, टीम इंडियाच्या संघातून घरच्या संघात पुनरागमन केलेल्या उनाडकटने शानदार गोलंदाजी करीत 2 विकेट घेतल्या. अभिमन्यू इस्वारनला त्याने खातेसुद्धा उघडू दिले नाही. त्याने त्याला बदकवर तंबूत धाडले. सौराष्ट्रच्या गोलंदाजांनी बंगालच्या फलंदाजांचा घाम काढला. बंगालच्या 6 फलंदाजांना सौराष्ट्रने अवघ्या 65 धावांवर घरचा रस्ता दाखवला. उनाडकटने बंगालच्या संघाला सुरूंग लावत अभिमन्यूला (0) भोपळ्यावर पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला.
बंगालची फलंदाजी :अभिषेक पोरेल, शाहनाझ अहमद सध्या खेळत आहेत. शाहनाझ अहमदने संयमी खेळी करीत 95 चेंडूत 57 धावा केल्या आहेत, तर अभिषेक पोरेल 91 चेंडूत 27 धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी बंगालची फलंदाजी घसरत त्यांच्या 6 विकेट गेल्या आहेत. सौराष्ट्रने त्यांची वरची फळी कापून काढत महत्त्वाचे फलंदाज तंबूत पाठवले आहेत. सौराष्ट्राचा स्टार गोलंदाज आणि कर्णधार उनाडकट ज्याचे टीम इंडियामध्ये सिलेक्शन झाले होते, त्याने शानदार गोलंदाजी करीत 2 विकेट घेतल्या. बंगालचे सुमंता गुप्ता, अभिषेक इश्वरन, सुदीप कुमार घरमी, मनोज तिवारी यांना साधे दुहेरी आकड्याची धावसंख्यादेखील गाठता आली नाही. केवळ आकाश घातक याने 6 फलंदाजामध्ये दुहेरी 17 आकडा पार केला. बंगाल अत्यंत दयनीय स्थिती पोहचला आहे.
सौराष्ट्रची गोलंदाजी :सौराष्ट्ने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत, प्रथम गोलंदाजी करताना बंगालचा निम्मा संघ गारद केला. कर्णधार जयदेव उनाडकटने शानदार गोलंदाजी करीत बंगालच्या संघाला पहिला सुरूंग लावत अभिमन्यू इश्वरनला शून्यावर तंबूत पाठवले. त्यानंतर चेतन साकरियाने यानेदेखील भेदक गोलंदाजी करीत 3 विकेट घेतल्या. त्याने सुमंता गुप्ता याला अवघ्या 1 धावेवर झेलबाद केले, तर सुदीप कुमार घरमीच्या भोपळ्यावर यष्टी उडवल्या.