जकार्ता -इंडोनेशियाच्या बाली येथे होणारी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा कोरोना विषाणूच्या साथीमुळे रद्द करण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार 2020 मैबॅंक मॅरेथॉन यावर्षी 30 ऑगस्ट रोजी होणार होती. मॅरेथॉनचे आयोजक आणि मैबॅंक इंडोनेशियाचे वाणिज्य प्रमुख यांनी याबाबत माहिती दिली.
कोरोनामुळे बाली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रद्द - news about bali marathon
2013 पासून दरवर्षी या मॅरेथॉनचे आयोजन होते. मागील वर्षी बाली येथे झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सुमारे 12,000 धावपटूंनी भाग घेतला होता. आतापर्यंत इंडोनेशियात कोरोना व्हायरसच्या 14,265 घटना घडल्या असून त्यामध्ये 991 लोकांचा मृत्यू झाला आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस जागतिक 10 हजार मॅरेथॉन ही जागतिक अॅथलेटिक्स गोल्ड लेबल शर्यत पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धा या वर्षी 22 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रोकॅम इंटरनॅशनलने शनिवारी दिली. यापूर्वी ही शर्यत 17 मे रोजी होणार होती. त्यानंतर ही स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे 13 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली.