महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि संगीता फोगट यांचे लवकरच 'बँड बाजा बारात' - संगीता फोगट

फोगट कुटुंबातील एका सदस्याने या लग्नाची माहिती दिली.

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि संगीता फोगट यांचे लवकरच 'बँड बाजा बारात'

By

Published : Aug 9, 2019, 2:08 PM IST

नवी दिल्ली - जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेला भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. फोगट कुटुंबातील सर्वात धाकटी बहिणी असलेली संगीता हिच्याशी त्याचे लग्न होणार आहे. पुढच्या वर्षीच्या होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकनंतर दोन्ही पैलवानांचे लग्न होणार आहे.

फोगट बहिणी

फोगट कुटुंबातील एका सदस्याने या लग्नाची माहिती दिली. 65 किलो वजनी गटात लढणारा कुस्तीपटू बजरंग आणि माजी राष्ट्रीय पदक विजेती संगीता यांनी आपल्या कुटुंबियांना लग्नाबद्दल सांगितले होते. या दोन्ही कुस्तीपटूंच्या घरी लग्नाचे बोलणे झाले आहे. मात्र तारीख अजून ठरलेली नाही.

संगिता राष्ट्रीय पातळीवर ५९ किलो वजनी गटात खेळते. संगीताहून मोठी असलेली बबिता फोगाट हिचे लग्न मल्ल विवेक सुहाग याच्यासोबत ठरले आहे. आपण आपल्या मुलीच्या इच्छेबाहेर नाही असे म्हणत संगिताचे वडील महावीर सिंह फोगट यांनी या लग्नाला पाठींबा दिला आहे. बजरंग सध्या ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त आहे.

फोगट कुटुंब

ABOUT THE AUTHOR

...view details