मनीला (फिलीपीन्स):दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने ( Olympic medalist PV Sindhu ) गुरुवारी सिंगापूरच्या युई यान जेस्लिन हुई ( Yue Yan Jeslyn Hui ) हिचा सरळ गेममध्ये पराभव करत बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या तिसऱ्या मानांकित भारतीय पुरुष दुहेरी संघानेही दुसऱ्या फेरीत विजय मिळवत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. पण लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत ( Silver medalist Kidambi Srikanth ) पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडले.
गिमचेन येथे 2014 आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या चौथ्या मानांकित सिंधूने जागतिक क्रमवारीत 100 व्या स्थानावर असलेल्या जेस्लिन हुईचा 42 मिनिटांत 21-16, 21-16 असा पराभव केला. पुढील फेरीत सिंधूची लढत तिसऱ्या मानांकित चीनच्या हेई बिंग झियाओशी होईल, जिला तिने पराभूत करून टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले आहे. सिंधूने बिंग जिओविरुद्ध सात सामने जिंकले आहेत, पण नऊ सामने गमावले आहेत. मात्र, गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूने बाजी मारली आहे.
सात्विक आणि चिराग या तिसर्या मानांकित भारतीय पुरुष दुहेरी जोडीने अकिरा कोगा आणि ताची सायटो या जपानी जोडीचा २१-१७, २१-१५ ( 21-17, 21-15 ) असा सरळ गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीचा पुढील सामना मलेशियन जोडी अॅरोन चिया आणि सोह वुई यिक या पाचव्या मानांकित जोडी आणि सिंगापूरच्या डेनी बावा कृष्णांता आणि जुन लियांग अँडी क्वेक ( Jun Liang Andy Quake ) यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.