नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती महिला कुस्तीपटू बबीता फोगट आणि 2014 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेती महिला कबड्डीपटू कविता देवी यांना हरियाणा सरकारने क्रीडा विभागात उपसंचालक म्हणून नियुक्त केले आहे. क्रीडा मंत्रालयाच्या मुख्य सचिवांनी हरियाणाच्या उत्कृष्ट खेळाडू (भरती व सेवा अटी) नियम-2018 अंतर्गत दोन स्वतंत्र आदेश काढून या नियुक्त्या केल्या.
महिला कुस्तीपटू बबीता फोगटला मिळाली नोकरी - Babita phogat deputy director news
आदेशानुसार, दोघांना एका महिन्यातच विभागात रुजू व्हावे लागेल. बबीताने या नियुक्तीबहद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि राज्याचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांचे आभार मानले आहेत. बबीताने नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर 2014 च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात तिला यश आले. 2012 च्या कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले होते.

बबीताने 2019 मध्ये राजकारणात प्रवेश केला. तिने दादरी येथून भारतीय जनता पार्टीकडून विधानसभा निवडणूकही लढवली. ती मात्र निवडणूक हरली. बबीता यापूर्वी हरियाणा पोलीस विभागात सब-इन्स्पेक्टर म्हणून तैनात होती. परंतु विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.