मुंबई - भारताची स्टार कुस्तीपटू बबिता फोगाटला सोमवारी पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. याची माहिती खुद्द बबिताने ट्विटरवरून दिली.
'आमच्या मुलाला भेटा, स्वप्नांवर विश्वास ठेवा, ते पूर्ण होतात. आमचे पूर्ण झाले आहे, निळ्या कपड्यांमध्ये पाहा, अशा आशयाची पोस्ट बबिताने शेअर केली आहे. बबिताने तिच्या मुलाचा फोटोही शेअर केला आहे.
बबिता फोगाट आणि विवेक सुहाग हे दोघेही कुस्तीपटू आहे. विवेक हा भारत केसरी पुरस्कार प्राप्त कुस्तीपटू आहे. तर बबिता फोगाट भारताची स्टार कुस्तीपटू आहे. तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकाची कमाई केली आहे. तसेच जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने कांस्यपदकाची मानकरी ठरली आहे.