इंदूर/मध्य प्रदेश : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पुढील दोन कसोटींमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला फ्रॅक्चर झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मोहम्मद सिराजच्या चेंडूचा फटका हाताच्या कोपऱयाला जोरात बसला, तरीही तो खेळपट्टीवर खेळत होता. परंतु, या दुखापतीने तो 15 धावांची खेळी करू शकला. परत आल्यानंतर हाताचे स्कॅन केल्यानंतर हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. त्याची रिकव्हरी होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्याने, त्याला परत सिडनीला जाणे भाग पडले आहे.
वॉर्नरला विश्रांतीचा सल्ला :टीम ऑस्ट्रेलियाच्या डाॅक्टरांनी त्याच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त करीत, त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो आता सिडनीला जाऊन उपचार घेण्यास सज्ज झाला आहे. तिथे उपचार घेऊन तो पुन्हा तंदुरुस्त होऊन वनडे इंटरनॅशनल खेळू शकतो, असेही डाॅक्टरांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिका (वनडे मॅच) 17 मार्चपासून सुरू होणार आहेत. तोपर्यंत त्याची रिकव्हरी होऊन तो खेळण्यासाठी फिट होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
वॉर्नरची कामगिरी निराशाजनक :त्याच्या दुखापतीपूर्वीही, वॉर्नर भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नव्हता. त्याने तीन सामन्यांमध्ये केवळ 1, 10 आणि 15 धावा केल्या. तीन अपयशांमुळे त्याची भारतातील सरासरी १९ कसोटी डावांतून २१.७८ इतकी खाली आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडसह सुरुवात केली, ज्यामध्ये डायनॅमिक फलंदाजाने 43 धावा केल्या. मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सोमवारी (20 फेब्रुवारी) पुष्टी केली की, वॉर्नर दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यास हेड सलामीवीर म्हणून कायम राहील.