नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. शनिवारी 11 फेब्रुवारी रोजी या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारत खूप मजबूत स्थितीत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला केवळ 117 धावा करता आल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीनंतर खेळपट्टीबाबत सातत्याने भाषणबाजी होत आहे. नागपूर कसोटी सामन्याच्या खेळपट्टीबाबत ऑस्ट्रेलियन मीडियाने प्रथम भारतीय संघावर अनेक आरोप केले. आता त्याच खेळपट्टीवर भारतीय खेळाडूंची फलंदाजी पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने यू-टर्न घेतला आहे.
ऑस्ट्रेलियन मीडियाची आरोप करण्याची पद्धती :ऑस्ट्रेलियन मीडियाने विरोधी संघातील खेळाडूंवर खोटे आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑस्ट्रेलियन मीडियाने सांगितले की, नागपूरच्या खेळपट्टीबाबत गोंधळ आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत आणि लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले.
खोटे आरोप करून आघाडीच्या संघावर दबावाचा प्रयत्न :यापूर्वीही असेच खोटे आरोप करून आघाडीच्या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. जेव्हा टीम इंडिया 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. त्यावेळीही असेच पाहायला मिळाले. त्यादरम्यान, ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय खेळाडूंवर खोटे आरोप केले होते आणि सांगितले होते की त्यांना क्वारंटाईनमध्ये राहायचे नाही. त्याचवेळी या प्रकरणाचे सत्य समोर आल्यावर ऑस्ट्रेलियन मीडियाने मौन बाळगले होते.
ऑस्ट्रेलिया मीडिया VS टीम इंडिया :ऑस्ट्रेलियन मीडियाने प्रथम बीसीसीआयवर नागपूरच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यानंतर भारतीय संघाचा खेळाडू रवींद्र जडेजावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजाने वेगवान गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांची चांगलीच दमछाक केली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला केवळ 177 धावांवर रोखले.
टीम इंडियाने मॅच रेफरीला दिला संपूर्ण व्हिडीओ :यामुळे ऑस्ट्रेलियन मीडियाला रवींद्र जडेजावर त्यांच्या टीमला सपोर्ट केल्याचा आरोप करून टीम इंडियावर दबाव आणायचा होता. रवींद्र जडेजाच्या बोटाला दुखापत असल्याने त्याने बोटावर क्रीम लावले होते, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ घेऊन ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय संघाला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण जेव्हा टीम इंडियाने मॅच रेफरीला संपूर्ण घटनेची माहिती दिली तेव्हा हे प्रकरण मिटले.
भारतीय कर्णधारा संयमी फलंदाजी :भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी खेळी करीत मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला होता. रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला. 16व्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली आहे. कसोटी सामन्यात शतक झळकावून, तो T20, ODI आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांनाही हा पराक्रम करता आला नाही. 2017 मध्ये, रोहितने प्रथमच वनडे आणि टी-20 मध्ये कर्णधारपद भूषवले. हे सर्व पाहता ऑस्ट्रेलियन मीडिया तोंडघशी पडली हे निश्चितच मानावे लागणार आहे.
हेही वाचा : Ind vs Aus First Test : भारताचा पहिला डाव 400 धावांवर समाप्त, 223 धावांची आघाडी; मर्फीने घेतल्या 7 विकेट