महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Wimbledon 2022 : रशियन खेळाडूंवर बंदी घालण्याच्या विम्बल्डनच्या निर्णयाचा एटीपीकडून निषेध - All England Club President Ian Hewitt

रशियन आणि बेलारशियन खेळाडूंना ( Russian and Belarusian players ) विम्बल्डन 2022 मध्ये स्पर्धा करण्यापासून, रोखण्याच्या ऑल इंग्लंड क्लबच्या निर्णयाचा तीव्र निषेध.

Russian
Russian

By

Published : Apr 21, 2022, 4:57 PM IST

न्यूयॉर्क:न्यूयॉर्क: युक्रेनच्या आक्रमणामुळे रशियन आणि बेलारशियन खेळाडूंना विम्बल्डन 2022 मध्ये प्रतिस्पर्धा करण्यापासून रोखण्याच्या ऑल इंग्लंड क्लबच्या निर्णयाचा ( All England Club Decision ) पुरुषांच्या व्यावसायिक टेनिस संघटनेच्या असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP) ने तीव्र निषेध केला आहे. ऑल इंग्लंड क्लबच्या निर्णयामुळे रशियाचा डॅनिल मेदवेदेव, पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत क्रमांक 2 आणि महिलांमध्ये 4 व्या क्रमांकावर बेलारूसची आर्यना सबालेन्का खेळाडूंवप परिणाम होईल.

ऑल इंग्लंड क्लबचे अध्यक्ष इयान हेविट ( All England Club President Ian Hewitt ) यांनी बुधवारी सांगितले होते की, रशियाच्या अशा अयोग्य आणि अभूतपूर्व लष्करी हल्ल्याच्या परिस्थितीत, रशियन किंवा बेलारशियन खेळाडूंच्या सहभागातून कोणताही फायदा मिळवणे रशियन राजवटीला अस्वीकार्य आहे. तथापि, एटीपीने जारी केलेल्या कठोर शब्दात निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीयतेच्या आधारावर भेदभाव करणे हे जागतिक टेनिस संघटनेच्या विम्बल्डनसोबतच्या कराराचे उल्लंघन आहे, तसेच रशियन आणि बेलारशियन खेळाडूंना तटस्थ ध्वजाखाली एटीपी सामन्यांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाईल.

निवेदनात म्हटले आहे की. "आम्ही युक्रेनवर रशियाच्या निंदनीय आक्रमणाचा तीव्र निषेध करतो आणि चालू युद्धामुळे प्रभावित झालेल्या लाखो निष्पाप लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत." आमच्या खेळाला गुणवत्ता आणि निष्पक्षतेच्या मूलभूत गोष्टींवर काम करण्याचा अभिमान आहे, जिथे खेळाडू त्यांचे स्थान मिळवण्यासाठी वैयक्तिक म्हणून एटीपी ( ATP ) क्रमवारीवर आधारित स्पर्धांमध्ये भाग घेतात.

ते पुढे म्हणाले, "आमचा विश्वास आहे की, विम्बल्डन आणि एलटीए ( Wimbledon and LTA ) (लॉन टेनिस असोसिएशन, ग्रेट ब्रिटनमधील टेनिसची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था) रशिया आणि बेलारूसमधील खेळाडूंना यावर्षीच्या ब्रिटिश ग्रास-कोर्ट स्विंगमधून वगळण्याचा एकतर्फी निर्णय अन्यायकारक आहे. तसेच निवेदनात म्हटले की, "रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना तटस्थ ध्वजाखाली एटीपी सामन्यांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाईल यावर जोर देणे महत्वाचे आहे, जे आतापर्यंत व्यावसायिक टेनिसमध्ये सामायिक केलेले स्थान आहे."

हेही वाचा -Ipl 2022 Updates : आरसीबीच्या ऍथलेटिक क्षेत्ररक्षणाने केले सर्वांना प्रभावित

ABOUT THE AUTHOR

...view details