गुवाहाटी -आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय धावपटू हिमा दासला पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदावर नियुक्तीचे औपचारिकपणे पत्र दिले. हिमाची एकात्मिक क्रीडा धोरणांतर्गत नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आसाम पोलिसात नव्याने भरती झालेल्या ५९७ उपनिरीक्षकांना नियुक्तीपत्रेही दिली.
राज्य शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलीस महासंचालकांसह, पोलीस विभागातील इतर अधिकारीही समारंभाला उपस्थित होते. डीएसपी म्हणून पदभार घेतल्यानंतर झालेल्या समारंभाला संबोधित करताना २१ वर्षीय हिमाने सांगितले की, तिने लहान असताना पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते.
आसाम सरकारने, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील क्लास-१ आणि क्लास-२ अधिकाऱ्यांच्या पदासाठी क्रीडापटूंना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. यात हिमा दासला पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.