मेलबर्न : अव्वल नामांकित अॅश बार्टीने रविवारी एलेना रेबकीनाचा सरळ सेटमध्ये पराभव करून तीन वर्षांत दुसऱ्यांदा अॅडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. या विजयामुळे, 2021 च्या सुरुवातीपासून बार्टीचा टॉप 20 मधील खेळाडूंविरुद्धचा विजय - पराजयचा रेकॉर्ड 17-1असा झाला आहे. बार्टीने अंतिम फेरीत रेबाकीनाचा 6-3, 6-2 असा पराभव केला.
ADELAID INTERNATIONAL CUP : अॅशले बार्टी आणि अॅनिसिमोव्हा यांनी पटकावले अॅडलेड आंतरराष्ट्रीय विजेतेपद - ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन
एश्ले बार्टीने (Asleigh Barty) डब्ल्यूटीए स्पर्धेत 14व्या विजेतेपदाच्या वेळी कोको गॉफ, 2020 ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सोफिया केनिन आणि 2020 फ्रेंच ओपन चॅम्पियन इंगा स्विटेक यांचाही पराभव केला आहे.
बार्टीने कोको गॉफ, 2020 ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सोफिया केनिन आणि 2020 फ्रेंच ओपन चॅम्पियन इंगा स्विटेकचा डब्ल्यूटीए स्पर्धेत 14 व्या विजेतेपदासह पराभव केला. बार्टी पुढील आठवड्यात सिडनी टेनिस क्लासिकमध्ये खेळणार आहे. त्यानंतर 17 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन होणार आहे. अमेरिकेच्या अमांडा अॅनिसिमोव्हाने मेलबर्न येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए स्पर्धेत बेलारूसच्या एलियाकसांद्रा सासनोविचला तीन सेटमध्ये 7-5, 1-6, 6-4 असा पराभव करून तिने दुसरे डब्ल्यूटीए विजेतेपद पटकावले.
हेही वाचा -श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय ; निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंसाठी जारी केली नवी नियमावली