नवी दिल्ली- उद्यापासून (१८ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंचा व्हिसा मंजूर केला आहे. यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा स्पर्धेतील सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या भीतीने चीनच्या खेळाडूंचा व्हिसा अद्याप भारताकडून मंजूर करण्यात आलेला नाही. चीन खेळाडूंबाबत आज निर्णय घेतला जाणार आहे.
भारताने पाकिस्तानचे चार कुस्तीपटू, एक प्रशिक्षक आणि एक सामनाधिकारी यांचा व्हिसा मंजूर केला आहे. याविषयी भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितलं की, पाकच्या ४ कुस्तीपटूंसह एक प्रशिक्षक आणि एक सामनाधिकारीला व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. चीनमधील कोरोना व्हायरसची भीती हा मोठा चिंतेचा विषय आहे. यामुळे त्यांना अद्याप व्हिसा देण्यात आलेला नाही. पण, आज चीनच्या खेळाडूंबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
अशी आहेत भारताने मंजूर केलेल्या व्हिसाधारक कुस्तीपटूंची नावे -
- मोहम्मद बिलाल (५७ किलो),
- अब्दुल रहमान (७४ किलो),
- तयब रझा (९७ किलो)
- झामन अन्वर (१२५ किलो)
भारताने 'या' कारणाने केला पाक खेळाडूंचा व्हिसा मंजूर -