रेयोंग (थायलंड) -अर्जुन लाल जाट आणि रवि या पुरुष डबल्स जोडीने शनिवारी एशियन रोईंग चँपियनशिप 2021 मध्ये सुवर्ण पदक तर परमिंदर सिंह याने सिंगल स्कल्समध्ये रौप्य पदक जिंकले. अर्जून लाल टोकियो ऑलिम्पिक मध्ये 11 व्या स्थानी राहिले होते.
डबल स्कल्स फायनलमध्ये भारताच्या अर्जुन लाल आणि रवी यांनी 6:57.383 मिनिट इतक्या वेळात फिनिश लाइन पार केली. त्यांनी चीनच्या झांग ली किंग व लू टिंग (7:02.357) यांच्यावर मात केली. चीन ने रौप्य पदक तर उज्बेकिस्तानच्या एम. दावरोनोव व ए. दोजरेव (7:07.734) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.