बीजिंग: चीनमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे, यावर्षी सप्टेंबरमध्ये हांगझोऊ येथे होणार्या आशियाई क्रीडा ( Asian Games ) स्पर्धा शुक्रवारी पुढे ढकलण्यात आल्या. CGTN टीव्ही या अधिकृत न्यूज चॅनेलनुसार, आशियाई ऑलिम्पिक कौन्सिल ( Asian Olympic Council ) ने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलली आहे, या स्पर्धेला ऑलिम्पिकनंतर दुसरी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा मानली जाते.
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, शांघायच्या नैऋत्येस सुमारे 175 किमी अंतरावर असलेल्या झेजियांग प्रांताची राजधानी हांगझोऊ येथे 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान क्रीडा स्पर्धा होणार होती. "आशियाई ऑलिम्पिक परिषदेने घोषित केले आहे की चीनमधील हांगझोऊ येथे 10 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत ( 19th Asian Games postponed )," असे गेम्सच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.