महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Asian Games India : बुध्दिबळ संघासाठी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद मार्गदर्शकाच्या भूमिकेत - आशियाई क्रीडा स्पर्धा

एआयसीएफने पुरुष आणि महिला गटातील 10 संभाव्य खेळाडूंची निवड केली आहे. गुजराथी, पी हरिकृष्णा, निहाल सरीन, एसएल नारायणन, के शशिकिरण, बी अधिबान, कार्तिकेयन मुरली, अर्जुन अरिगासी, अभिजित गुप्ता आणि सूर्य शेखर गांगुली यांचा त्यात समावेश आहे.

vishwanathan anand
vishwanathan anand

By

Published : Jan 29, 2022, 5:43 PM IST

नवी दिल्ली -आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल 12 वर्षांनंतर बुद्धिबळ खेळाचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी अनुभवी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद संघात मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहे. आठ महिन्यांनी सुरू होणाऱ्या स्पर्धेत खेळाडू अधिक चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (AICF) व्यक्त केली.

भारताच्या पुरुष संघ आणि महिला खेळाडूंनी कांस्यपदक जिंकले, ते खेळ 2010 च्या ग्वांगझू खेळाचा भाग होते. या खेळातील भारताची सर्वोत्तम कामगिरी 2006 दोहा आशियाई खेळांमध्ये झाली. तेव्हा त्यांनी दोन सुवर्ण जिंकले होते. महिला वैयक्तिक स्पर्धेत कोनेरू हम्पीने अव्वल स्थान पटकावले.

हा आहे पुरूष सांघिक गट

एआयसीएफने ग्वांगझू गेम्ससाठी पुरुष आणि महिला गटातील 10 संभाव्य खेळाडूंची निवड केली आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या आधारावर संघाची निवड करण्यात आली आहे. गुजराथी, पी हरिकृष्णा, निहाल सरीन, एसएल नारायणन, के शशिकिरण, बी अधिबान, कार्तिकेयन मुरली, अर्जुन अरिगासी, अभिजित गुप्ता आणि सूर्य शेखर गांगुली यांनी पुरुष सांघिक गटात स्थान मिळवले.

यातून निवडणार महिला संघ

के हंपी, डी हरिका, वैशाली आर, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी, वंतिका अग्रवाल, मेरी अॅन गोम्स, सौम्या स्वामीनाथन आणि ईशा करावडे यांच्यामधून महिला संघ निवडला जाईल. या खेळांमध्ये अनुभवी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद संघात मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहे. ३ फेब्रुवारीपासून तो आणि खेळाडू यांच्यातील पहिले सत्र सुरू होणार आहे. बुद्धिबळ स्पर्धा 11 सप्टेंबरपासून सुरू होणार असून या दोन प्रकारात खेळल्या जातील. 11 ते 14 सप्टेंबर या कालावधीत पुरुष आणि महिलांच्या वैयक्तिक स्पर्धा जलद वेळेत खेळल्या जातील.

हेही वाचा -IPL 2022 Mega Auction:एम एस धोनी मेगा लिलावापूर्वी चेन्नईत दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details