हँगझोऊAsian Games 2023 : आशियाई खेळ 2023 हॉकीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात भारतीय महिला संघानं शनिवारी जपानचा पराभव करत कांस्यपदक जिंकलं. 2014 नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं हे चौथं महिला हॉकी कांस्यपदक आहे. भारतीय महिला हॉकी संघानं 2018 लासी रौप्य पदक जिंकलं होतं. भारताकडून दीपिका, सुशीला चानूनं गोल केले, तर जपानसाठी एकमेव गोल युरी नागाईनं तीसाव्या मिनिटाला केला.
टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी :भारतीय महिला हॉकी संघानं चीनच्या हँगझोऊ येथील गोंगशु कॅनाल स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर कांस्यपदक जिंकण्यासाठी आक्रमकपणे सामन्याची सुरुवात केली. पाचव्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक घेण्याची संधी होती, ज्याचं दीपिकानं गोलमध्ये रुपांतर करत टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
जपानच्या युरी नागाईनं केला गोल : यानंतर भारतीय संघानं पहिल्या क्वार्टरमध्ये सतत चेंडूवर नियंत्रण ठेवलं. त्यामुळं जपानच्या खेळाडूंना गोल करण्याची एकही संधी मिळाली नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय खेळाडूंनी आपलं वर्चस्व कायम राखलं. मात्र, सामन्याचा पूर्वार्ध पूर्ण होण्याआधीच जपानच्या युरी नागाईनं पेनल्टी कॉर्नरच्या संधीचं रुपांतर करत स्कोअर 1-1 सामना बरोबरीत आणला. सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर आत्मविश्वासानं भरलेल्या जपानच्या संघानं आक्रमक खेळ करत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भारतीय संघाकडून सातत्यानं प्रयत्न सुरूच राहिले. मात्र तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.