महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑलिम्पिक पात्रता : सिमरनजीत कौर अंतिम फेरीत, मेरी कोमला 'कांस्य'

महिला ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत मेरी कोम विरुद्ध युआन चांग यांच्यात सामना रंगला होता. अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या क्षणी युआन हिने मेरीचा ३-२ ने पराभव केला.

Asian Boxing Olympic qualifiers: Simranjit Kaur storms into finals, assures silver medal
ऑलिम्पिक पात्रता : सिमरनजीत कौर अंतिम फेरीत, मेरी कोमला 'कांस्य'

By

Published : Mar 10, 2020, 11:17 PM IST

अम्मान(जॉर्डन) - सहा वेळा जागतिक विजेती आणि ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमला आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या युआन चांग हिने मेरीचा पराभव केला. तर दुसरीकडे भारतीय सिमरनजीत कौरने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

सिमरनजीत कौर

महिला ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत मेरी कोम विरुद्ध युआन चांग यांच्यात सामना रंगला होता. अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या क्षणी युआन हिने मेरीचा ३-२ ने पराभव केला.

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय बॉक्सिंगपटू...

महिला ६० किलो वजनी गटात सिमरनजीत कौरने धडाकेबाज कामगिरी नोंदवली. तिने उपांत्य सामन्यात चीनच्या शिहरी वू हिला ४-१ ने धूळ चारत अंतिम फेरी गाठली.

हेही वाचा -भारताचे ७ बॉक्सिंगपटू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

हेही वाचा -ऑलिम्पिक पात्रता : विकास अंतिम फेरीत, पांघल, लवलिना यांना कांस्य पदकावर समाधान

ABOUT THE AUTHOR

...view details