नवी दिल्ली - भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने २१ व्या अशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत महिला एकेरी रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने अंतिम सामन्यात भारताच्याच अंकिता भाकतचा पराभव केला. अंकिता भाकतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
दीपिका कुमारी आणि अंकिता भाकत यांनी स्पर्धेची उपांत्य फेरीत गाठत टोकियो ऑलम्पिकचे तिकीट निश्चित केले होते. अंकिताने भूतानची कर्मा आणि दीपिकाने व्हिएतनामची एनगुएटचा पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात दीपिकाने अंकिताचा ६-० ने सरळ पराभव केला.