महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

BOXING : आशिष कुमारची सुवर्णकामगिरी, थायलंड ओपनमध्ये जिंकले सुवर्ण - थायलंड ओपन

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आशिषने कोकोरियाच्या किम जिनजाईचा ५-० असा पराभव केला.

BOXING : आशिष कुमारची सुवर्णकामगिरी, थायलंड ओपनमध्ये जिंकले सुवर्ण

By

Published : Jul 28, 2019, 1:49 PM IST

नवी दिल्ली -आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा भारताचा बॉक्सर आशिष कुमारने सुवर्ण कामगिरी केली आहे. आशिषने थायलंड ओपनच्या बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या ७५ किलो वजनीगटात त्याने ही कामगिरी केली आहे.

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आशिषने कोकोरियाच्या किम जिनजाईचा ५-० असा पराभव केला. या विजयासह भारताने चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह आठ पदकांची कमाई केली आहे. भारताच्या एकूण पाच खेळाडूंनी अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्यामध्ये एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता.

महिलांच्या ५१ किलो वजनी गटात निखात झरीनला चँग युआनने ५-० अशी धूळ चारली. तर ५६ किलो गटात थायलंडच्या चाटचाय डेशा बुटडीने हसमुद्दीनचा ५-० असे नमवले. ४९ किलो गटात दीपकने उझबेकिस्तानच्या मिर्झाखमेदोव्ह नॉदिजॉनला हरवले. तर ८१ किलो गटात थायलंडच्या अनावट थाँगक्रॅटॉव्हने ब्रिजेश यादवचा ४-१ असा पराभव केला.

ABOUT THE AUTHOR

...view details