मेलबर्न :जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली महिला टेनिसपटू अॅशले बार्टीने ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीचे (Australian Open 2022) विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी अंतिम सामन्यात बार्टीने डॅनियल कॉलिन्सचा पराभव करत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले.
44 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी अॅशलेग बार्टी ही पहिली ऑस्ट्रेलियन महिला ठरली आहे. रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूने अमेरिकेच्या कॉलिन्सचा 6-3, 7-6 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणारी अॅशले बार्टी 44 वर्षांतील पहिली महिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरली आहे. बार्टीच्या आधी माजी टेनिसस्टार ख्रिस ओ'नीलने ऑस्ट्रेलियन ओपन एकेरी ट्रॉफीवर कब्जा केला होता.