मुंबई - अर्मेनियाचा अव्वल ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू लेव्हॉन अरोनियनची पत्नी महिला आंतरराष्ट्रीय मास्टर अरियानी कॅओईलीचे मंगळवारी अपघाती निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षीच तिला मृत्यूनं गाठलं.
अर्मेनियातील येरेवान येथे अरियानीची गाडी खांबावर आदळली होती. मागील १५ दिवसांपासून तिच्यावर उपाचार सुरू होते. मात्र अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली. तिच्या निधनाची बातमी तिचा पती लेव्हॉन अरोनियानने सोशल मीडियावरून दिली.