महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अजूनही जिवंत, थरारक सामन्यात अर्जेंटिनाचा ऑस्ट्रेलियावर 2-1 ने विजय

अखेरच्या काही मिनिटात ऑस्ट्रेलियाने अर्जेंटिनाच्या गोलवर जोरदार हल्ले चढवले मात्र अर्जेंटिनाच्या बचाव फळीने हे सर्व हल्ले परतावून लावले. अखेरच्या मिनिटाला अर्जेंटिनाचा गोलकीपर एमी मार्टीनेझने एक उत्कृष्ट बचाव करत ऑस्ट्रेलियाच्या बरोबरी करण्याच्या आशा धुळीस मिळवल्या. (Argentina beat Australia). आता उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. (FIFA World Cup 2022).

FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022

By

Published : Dec 4, 2022, 3:36 PM IST

अल रेयान (कतार) : लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) काल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत त्याच्या पहिला गोल नोंदवला. त्याच्या या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव करत अंतिम 8 मध्ये आपले स्थान निश्चित केले. (Argentina beat Australia). विशेष म्हणजे हा मेस्सीच्या प्रोफेशनल करियर मधील 1000 वा सामना होता. मेस्सीने मॅचमध्ये 34व्या मिनिटाला गोल करत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकात आता मेस्सीचे एकूण नऊ गोल झाले आहेत जे अर्जेंटिनाच्या महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनापेक्षा एकने अधिक आहे. (FIFA World Cup 2022).

अर्जेंटिनाच्या बचाव फळीचे उत्कृष्ट प्रदर्शन : अर्जेंटिनाचा स्ट्रायकर ह्युलियन अल्वारेझने ऑस्ट्रेलियाचा गोलरक्षक मॅथ्यू रायनने केलेल्या चुकीचा फायदा उचलत 57व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल केला. 77व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या क्रेग गुडविनचा शॉट अर्जेंटिनाचा मिडफिल्डर एन्झो फर्नांडिसच्या चुकीने स्वत:च्याच नेटमध्ये. या गोलने ऑस्ट्रेलियाने आघाडी थोडी कमी केली. अखेरच्या काही मिनिटात ऑस्ट्रेलियाने अर्जेंटिनाच्या गोलवर जोरदार हल्ले चढवले मात्र अर्जेंटिनाच्या बचाव फळीने हे सर्व हल्ले परतावून लावले. अखेरच्या मिनिटाला अर्जेंटिनाचा गोलकीपर एमी मार्टीनेझने एक उत्कृष्ट बचाव करत ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीच्या साऱ्या आशा धुळीस मिळवल्या. आता उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे.

मेस्सीसाठी शेवटची संधी : ऑस्ट्रेलियाने या विश्वचषकात अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी विश्वचषकात केवळ दुसऱ्यांदा बाद फेरी गाठली आहे. 2006 मध्ये अखेरच्या 16 मध्ये ऑस्ट्रेलियाला इटलीकडून पराभव पत्करावा लागला होता. तर दुसरीकडे अर्जेंटिनाने आपल्या पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाकडून झालेल्या धक्कादायक पराभवातून स्वत:ला सावरत तीन सलग गेम जिंकले आहेत. मेस्सीच्या कारकिर्दीतील हा 789वा गोल होता. तो 18 डिसेंबर रोजी त्याच्या पाचव्या आणि संभाव्य शेवटच्या विश्वचषकात फुटबॉलची सर्वात मोठी ट्रॉफी जिंकून त्याच्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम देऊ शकतो. या सातवेळचा बॅलन डो-ओर विजेत्या खेळाडूला अजूनही विश्वचषकात हाती निराशाच आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details