महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ISSF Shooting World Cup: अपूर्वी चंदेलाला 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक - Apurvi Chandela

अपूर्वीचे यापूर्वी फेब्रुवारीमध्ये नवी दिल्लीत झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतही 252.9 गुणांसह सुवर्णपदक जिंकले होते

अपूर्वी चंदेला

By

Published : May 27, 2019, 8:30 AM IST

म्युनिच (जर्मनी) -वर्षांतील तिसऱ्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात भारताची आघाडीची महिला नेमबाज अपूर्वी चंदेलाने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. अपूर्वीने अंतिम लढतीत चीनची महिला नेमबाज वँग लुयाओला (250.8 गुण) मागे सारत 251 गुणांसह सुवर्णवेध घेतला.

अपूर्वीचे या वर्षातील हे दुसरे सुवर्णपदक असून यापूर्वी फेब्रुवारीमध्ये नवी दिल्लीत झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतही 252.9 गुणांसह सुवर्णपदक जिंकले होते. या सुवर्णपदकासह तीने 2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही मिळवले होते.

10 मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या अपूर्वीने 2018 च्या एशियन गेम्समध्येही कांस्य पदक पटकावले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details