माद्रिद : ब्रिटनच्या अँडी मरेने ( Andy Murray ) जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचविरुद्धच्या सामन्यापूर्वी माद्रिद ओपनमधून माघार घेतली. स्पर्धेच्या आयोजकांनी गुरुवारी एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मरेने कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हचा 6-1, 3-6, 6-2 असा पराभव करत एटीपी 1000 माद्रिद ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. तीन ग्रँडस्लॅम विजेत्या 34 वर्षीय खेळाडूने जानेवारीपासून सिडनीमध्ये सलग सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दोन माजी टॉप 10 खेळाडू, ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएम आणि शापोवालोव्हवर दुसऱ्या फेरीतील विजयानंतर मरेचा सामना सर्बियाच्या जागतिक क्रमवारीत नंबर 1 असलेल्या जोकोविचशी होणार होता, परंतु आयोजकांनी त्याच्या खेळण्यास असमर्थता नोंदवली आहे.