बँकॉक - भारतीय बॉक्सर अमित पंघलने शुक्रवारी आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. मागच्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमितने ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोरियाच्या किम इनक्यूचा पराभव करत हे सुवर्णयश मिळविले.
आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा; अमित पंघलने पटकावले सुवर्णपदक - Asian Boxing Championships
५२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अमितने कोरियाच्या किम इनक्यूचा केला पराभव
अमित पंघल
उपात्य फेरीत अमितने चीनच्या जियांगुआनचा ४-१ ने पराभव केला होता. या स्पर्धेपूर्वी अमितने स्ट्रांजा मेमोरीयल स्पर्धेत सुवर्ण पदक नावावर केले होते. ४९ किलो वजनी गटातून ५२ किलो वजनी गटात आल्यानंतर अमितची ही पहिलीच स्पर्धा होती.
भारताच्या हाती ४९ किलो वजनी गटातून निराशा आली. या गटात नॅशनल चॅम्पियन दीपक सिंगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर ५६ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कविंद्र सिंग बिश्तला पराभवाचा सामना करावा लागला.