नवी दिल्ली -भारतीय बॉक्सिंग महासंघाचे (BFI) अध्यक्ष अजय सिंह यांनी मंगळवारी अर्जुन पुरस्कारासाठी बॉक्सर अमित पंघलची शिफारस केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे. मात्र, बॉक्सिंग महासंघाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह अन्य पुरस्कारांसाठी कोणत्याही खेळाडूची अजूनतरी घोषणा केलेली नाही.
अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय बॉक्सिंग महासंघाकडून अमित पंघलची शिफारस - BFI
अमितने मागच्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते
अमित पंघल
अमितने नुकत्याच झालेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तर मागच्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
यापूर्वी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) भारतीय कुस्ती महासंघ (WFI) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) अर्जुन पुरस्कारासाठी आपआपल्या खेळाडूंच्या नावांची शिफारस केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे करण्यात आलीय.