महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अमित पंघालसह भारतीय बॉक्सर सज्ज

28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यावेळी भारतातील 215 खेळाडू ( 215 Indian athletes participated in CWG ) 19 विविध खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर चाहते राष्ट्रकुल स्पर्धेत मोठ्या संख्येने पदकांची अपेक्षा करत आहेत.

AMIT PANGHAL
अमित पंघाल

By

Published : Jul 24, 2022, 4:41 PM IST

नवी दिल्ली :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ( Commonwealth Games Competition ) भारतीय बॉक्सर रिंगमध्ये उतरतील तेव्हा अमित पंघाल ( Boxer Amit Panghal ) टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील निराशा विसरून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. तर लोव्हलिना बोरगोहेन ( Boxer Lovlina Borgohain ) जागतिक स्पर्धेतील खराब कामगिरी विसरून जातील. सर्वांच्या नजरा सध्याच्या विश्वविजेत्या निखत जरीनवर असतील, तिने आपली सुवर्ण मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. निखतने नुकतीच चांगली कामगिरी केली आहे. तिने राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले, त्यानंतर प्रतिष्ठित स्ट्रॅन्डजा मेमोरियल टूर्नामेंट आणि त्यानंतर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेत या 26 वर्षीय बॉक्सरसमोर वेगळ्याच आव्हानाला सामोरे जावे लागेल, ही वेगळी बाब आहे.

निखत 52 किलो ( World champion Nikhat Zarin ) गटात खेळते पण राष्ट्रकुल स्पर्धेत तिला 50 किलोमध्ये भाग घ्यावा लागेल. पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिची वजन श्रेणी ठरवण्यासाठी ती या नवीन वजन श्रेणीशी कशी जुळवून घेते हे तिला आणि तिच्या प्रशिक्षकांना पहावे लागेल. जोपर्यंत लोव्हलिनाचा संबंध आहे, हे वर्ष तिच्यासाठी चढ-उतारांचे होते. आसामच्या बॉक्सरने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तेव्हापासून तिच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

टोकियो ऑलिम्पिकनंतर विविध स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने तिचे लक्ष विचलित झाले आणि तिच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे 24 वर्षीय तरुणीने मान्य केले. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा कांस्यपदक जिंकणारी लोव्हलिना यावेळी लवकर बाहेर पडली. अशा स्थितीत ती राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकून ही निराशा दूर करण्याचा प्रयत्न करेल. पंघलने (51 किलो) अखेरचे गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तो ऑलिम्पिकमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, पण त्याला उपउपांत्यपूर्व फेरीच्या पुढे प्रगती करता आली नाही.

यानंतर पंघालने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ( World Championship 0 भाग घेतला नाही. त्याने थायलंड ओपनमध्ये पुनरागमन केले जेथे त्याला रौप्य पदक जिंकण्यात यश आले. राष्ट्रकुल स्पर्धेतही तो पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात असून यावेळी तो अपेक्षांवर खरा उतरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे, अनुभवी शिव थापा (63.5 किलो) देखील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक आपल्या नावावर नोंदवू इच्छितो. या 28 वर्षीय बॉक्सरची आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पाच पदके आहेत. गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये तो सहभागी झाला नव्हता.

ऑलिम्पियन आशिष कुमार ( Olympian Ashish Kumar ) (80 किलो), गेल्या वेळचा कांस्यपदक विजेता मोहम्मद हुसामुद्दीन (57 किलो) आणि आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेता संजीत (92 किलोपेक्षा जास्त) हे देखील विजेतेपदाचे दावेदार आहेत. रोहित टोकस (67 किलो), सुमित कुंडू (75 किलो), आणि सागर (+92 किलो) यांना कमी अनुभव आहे. परंतु त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे. या सामन्यांचे दडपण ते कसे हाताळतात हे पाहणे रंजक ठरेल. महिला विभागात, अनुभवी एमसी मेरी कोमच्या अनुपस्थितीत, सर्व आशा लव्हलिना आणि निखत यांच्यावर असतील, परंतु पदार्पण करणाऱ्या नीतू घनघास (48 किलो) आणि जास्मिन लांबोरिया (60 किलो) यांनाही हलके घेता येणार नाही.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे:

महिला: नीतू (48 किलो), निखत जरीन (50 किलो), जास्मिन (60 किलो), लोव्हलिना बोरगोहेन (70 किलो).

पुरुषः अमित पंघाल (51 किलो), मोहम्मद हुसामुद्दीन (57 किलो), शिव थापा (63.5 किलो), रोहित टोकस (67 किलो), गतविजेता सुमित (75 किलो), आशिष कुमार (80 किलो), संजीत (92 किलो) आणि सागर (92+ किलो).

हेही वाचा -Celebration At Panipat : नीरजच्या यशानंतर गावात जल्लोष, आई म्हणाली चुरमा करून खाऊ घालणार

ABOUT THE AUTHOR

...view details